’फणसाचे गीतगरे

’फणसाचे गीतगरे’ हा माझा ई-गीतसंग्रह प्रसिद्ध झाला. हा फ़्री गीतसंग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.

Advertisements
Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

तुझ्याविना सजणे

तुझ्याविना सजणे

व्यर्थ आहे जग हे सारे  तुझ्याविना सजणे ॥
अर्थ नाही जगण्यामध्ये तुझ्याविना सजणे ॥१॥

पूर्ण बघ झाले घर ते अपुल्या स्वप्नातले ॥
पर्णहीन गृहवट हा तुझ्याविना सजणे ॥२॥

सप्तसुरांच्या बांधणीतले गंधर्वांचे ऐकुन गाणे ॥
मंत्रमुग्ध मी नाही झालो तुझ्याविना सजणे ॥३॥

उंच आकाशी दूर मी गेलो तुला विसरण्यासाठी ॥
मन धरतीवर देह आकाशी तुझ्याविना सजणे ॥४॥

देवा चाले तुझ्याऐवजी एक सुपारी गाठी ॥
नाही पूजा करणार तयाची तुझ्याविना सजणे ॥५॥

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती

चालीसाठी येथे क्लिक करा 

गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती ॥धॄ॥

 

कॄपासिंधू तू, तिमिर दूर कर, दीपपुंज पणती ।

अनाथ बंधू, भरभराट कर, आण सुफल भरती ॥

            लवूनी नमस्कार करिती

गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती ॥१॥

 

दु:खनिवारक तू गजवदना, आण हास्य ओठी ।

सुखदायक तू मंगलमूर्ती, स्वर्ग आण धरती ॥

           लवूनी नमस्कार करिती

गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती ॥२॥

कार्यारंभी पूजन करिती, लावून पणास भक्ती ।

मनगट बळकट करणारी ही, कामपूर्तीची शक्ती ॥

          लवूनी नमस्कार करिती

गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती ॥३॥

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

Link To Buy फणसाचे गरे My first Ebook

Link To Buy फणसाचे गरे My first Ebook

Go to http://www.pothi.com/

Click on Buy Books: There are two ways to search as under:

(1) click on ebook new. Select Marathi in All languages option in search box. After that select Literature & Fiction in All categories option. Click Search and scroll down to see the entry of फणसाचे गरे Click on Buy Now then follow instructions.

(2)Click on search books and enter सुहास फणसे in the search box. Copy सुहास फणसे from here.

Click on फणसाचे गरे (it appears in blue colour). You will see the entry of the book. Click on Buy Now then follow instructions.

Posted in Entertainment, Marathi Katha | यावर आपले मत नोंदवा

आनंदाची बातमी !

 माझा ई-कथासंग्रह ’फणसाचे गरे’ पोथी डॉट कॉम वर ई-प्रकाशित झाला आहे. या संकेत स्थळावर जाऊन ’बाय बूक्स’ मधल्या सर्च वर जाऊन सुहास फणसे चा शोध घ्या. हे पुस्तक फक्त १०० रुपयात डाउनलोड करता येते. भारतात सध्याच्या टोमॅटोच्या प्रतीकिलो भावात तर परदेशात कोलाच्या/पाण्याच्या बाटलीच्या भावात कथासंग्रह मिळतो आहे. मग त्वरा करा. 

Posted in Entertainment, Marathi Katha | यावर आपले मत नोंदवा

पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू

पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू
               माणूस सामाजिक प्राणि आहे. त्याला सोबत लागते. नातेवाईक, मित्र, शेजारी आणि पाळतू जनावरांमध्ये सुद्धा आपण सोबत शोधत असतो. एकटे असतांना मन अघोरी विचार करू शकते. ’एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप’, नाही का! सोबतीमुळे आपल्याला आनंद मिळतो, दु:ख कमी होते. आपल्या नडीच्या वेळी जो कामी येतो, तो खरा मित्र!
               एकमेकांच्या सुख-दु:खात आपण सहभागी होतो. फोन/टेक्स्ट/पत्र याद्वारे अप्रत्यक्षपणे आपण शुभचिंतन/सांत्वन करतो. कौटुंबिक प्रसंगात एकमेकांच्या घरी जातो. शुभ प्रसंगी पाहुणे भेटवस्तू देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. यजमान पाहुण्यांचे यथोचित आदरातिथ्य करतात. देण्या-घेण्याचा हा सामाजिक व्यवहार असतो. पण व्यवहार असला तरी यात आर्थिक नफा-तोट्याच्या गणिताला स्थान नसते. कोणी किती दिले यावर आदरातिथ्य ठरत नसते. सर्वांचे आदरातिथ्य एकसारखेच होते.
               आर्थिक परिस्थिती चांगली नसतांना अहंपणाला दूर ठेवावे लागते. पण आर्थिक श्रीमंती आली की विनय कमी होऊ लागतो. मध्यम वर्गीय सवय असते की कर्ज लवकरात लवकर फेडून टाकायचे. गरीबांना ते शक्य नसते. थोडा पैसा आला की कर्ज फेडून आपण काहीतरी ’ग्रेट’ केल्याची भावना निर्माण होऊन मनाला शांती मिळते.
                गरीब असतांना मिळालेली भेटवस्तू आपण चूपचाप ठेवून घेतो. आपल्याला परवडेल असाच अहेर देतो. आपल्यावर काहीतरी कर्ज उरले आहे, असा विचार मनात आणत नाही. ज्यांच्या मनात असा विचार येतो ते श्रीमंतांशी सामाजिक संबंध ठेवणे टाळतात. पुष्कळसे श्रीमंत लोकही अशा देण्या-घेण्याचे आर्थिक गणित मांडित नाही. सर्वसाधारणपणे असे कर्ज अन्य प्रकारे फेडण्याचा प्रयत्न केला जातो. वाढदिवशी भेट मिळाली तर ती देणाऱ्याच्या मुलीच्या डोहाळ-जेवणाच्या वेळी भेट दिली जाते. असे रहाट-गाडगे चालत राहते.
               पण श्रीमंतीमुळे काही लोक अधीर होऊ लागले आहेत. असे सामाजिक कर्ज ताबडतोब फेडून टाकण्याकडे कल वाढू लागला आहे. भाउबिजेला भावाने ओवाळणी टाकण्याचाच अवकाश की बहिणीने भावजईला हळद-कुंकू लावून भेट दिलीच समजा. वाढदिवशी रिटर्न-गिफ़्टची प्रथा चांगलीच जमलेली आहे. आदरातिथ्य आणि भेटवस्तूंच्या देण्याघेण्याने ’फिटंमफाट’ होते, असा पूर्वी समज होता. पण आपण नाही का नातेवाईकांना लग्न-सोहळा संपल्यावर परत जातांना लाडू-चिवड्याबरोबर अहेर देत! तसाच काहीसा प्रकार खूप साऱ्या समारंभात दिसायला लागला आहे.
               आप्तमित्रांकडून भेट घेण्यात कमीपणा वाटू लागल्यामुळे काही लोक निमंत्रण पत्रिकेत ’भेटवस्तू आणू नये’, अशी टीप घालू लागले आहेत. पाहुण्यांनी रिकाम्या हाताने उत्सव-मूर्तींना कोरडे आशिर्वाद द्यावेत, असाच या टीपेमुळे अर्थ व्यक्त होतो. या टीपेवर तोडगा म्हणून पाहुणे पुष्पगुच्छ देऊ लागले तर त्यावरही बंदी यायला लागली आहे. घनिष्ट आप्त-मित्रांची अशा टीपेमुळे कोंडी होते, हे यजमान विसरतात. 
 मजा अशी की अशी टीप लिहिणारेच लाडू-चिवड्याबरोबर अहेर देण्यात आग्रही असतात. याशिवाय असेही लक्षात आले आहे की हे लोक भूतकाळात नेहेमीच सर्व समारंभात अगत्याने अहेर देत आलेले असतात. अशा टीपेमुळे नाराज झालेल्या एका नातेवाईकाने ’तुम्ही अमक्यावेळी दिलेला अहेर परत करीत आहे’, असे सांगून यजमानाला ’टीप’ गिळायला लावली. यजमानाच्या घरी जाऊन आपली भेटवस्तू ठेवून येणे, हा तोडगा लोकांना आवडू लागल्याचे दिसते.
               सामाजिक व्यवहार आर्थिक तराजूने तोलल्यास संबंधांवर वाईट परिणाम होऊ शकतो, हे सगळ्यांनी समजायला पाहिजे. अहेर देणे सीमेच्या पलिकडे गेले की घेणाऱ्याच्या मनात कर्ज झाल्याची भावना येते, हे लक्षात ठेवले पाहिजे. पुष्पगुच्छ/भेटवस्तू घेणे बंद करायचे असेल तर आदरातिथ्यही बंद करायला पाहिजे. मग समारंभांना काही अर्थच उरणार नाही. माणूस उत्सवप्रिय सामाजिक प्राणि आहे. आनंद हिरावून घेणाऱ्या प्रथांना जोरदार विरोध केला पाहिजे.

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

फ़ादर’स डे स्पेशल

पितृदिनाच्या निमित्ताने माझा या खालील गीताकडे आपले लक्ष्य वेधित आहे.

चाल समजण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. 

 बाबाऽऽऽऽऽ बाबाऽऽऽऽऽ

 नाहित नुसते जन्मदाताऽऽ

 आहेत मूर्तीमंत त्राता ॥धृ॥

 कुटुंब संरक्षक हितवर्धक धीरोदात्त बाबा

मार्गदर्शक, जबाबदार कर्तव्यदक्ष बाबा ॥१॥ 

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा

शांत प्रेमळ कठोर रागिट बहुरुपीऽऽ बाबा  ॥२॥

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा