एथ्निक वऱ्हाडी हॉलिडे Marathi Short Story

वासंती आळोखे-पिळोखे देत बेडवरून उठली. दररोज सकाळी सहा वाजता तिच्या बेडरूममधला कम्प्युटर आपोआप बूट होत असे. तसा आजही झाला. स्क्रीनवर आजची दैनंदिनी झळकत होती. पार्श्वभूमीवर भूपाळीचे मंद स्वर रात्रीच्या निरवतेची जागा घेऊन बेडरूममध्ये एक सौज्वळ वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. वासंती दर महिन्याला कम्प्युटरचे पार्श्वसंगीत बदलत असे. या महिन्यात मराठी संगीताची वर्णी लागली होती. वेळेनुसार योग्य ते राग पार्श्वसंगीताचा ताबा घेणार होते. मराठी संगीताची वर्णी लागण्याचे कारण स्क्रीनवरच्या दैनंदिनीतल्या सकाळी ११ वाजताच्या नोंदीत होते.
वासंतीने चहासाठी मायक्रोवेव्हचे बटन दाबले व दात ब्रश करण्यासाठी बाथरूममध्य जाऊन तिने विद्युत-ब्रश तुथपेस्टच्या फ़ेसात वर-खाली फिरविण्यास सुरुवात केली. ब्रश करता-करता नेहमीच्या सवयीने ती बेसिनवरच्या मोठ्या ओवल आरशात स्वत:चे रूप न्याहाळू लागली. कोणालाही हेवा वाटावा असे सौंदर्य देवाने तिच्या पदरात टाकले होते आनि तिनेही त्या देणगीची छान नीगा राखली होती. ’जगात सर्वात सुंदर कोण?’, असे आरशाला विचारायची गरजच नव्हती. सौंदर्य हे पाहाणाऱ्याच्या दृष्टीत सामावले आहे, ही म्हण वासंतीच्या बाबतीत खरी होती. दररोजप्रमाणेच आजही तिला आरशातल्या परीचा हेवा वाटला. आपणच आपला हेवा करतो आहे, हे लक्षात येऊन ती लाजली व लाजल्याने तिच्या शरीरात झालेली परिवर्तने तिच्या डोळ्यांनी टिपली पण दररोजप्रमानेच तिच्या संयमाचा विजय झाला.
बेडरूममध्ये येऊन तिने ड्रेसिंग-गाऊन चढविला व बाहेर किचनमध्ये, तो पर्यंत तयार झालेला मायक्रोवेव्हमधला चहा घेऊन ती परत कम्प्युटरसमोर येऊन बसली. आजची ११ वाजताची नोंद लाल अक्षरात उठून दिसत होती.
या नोंदीची संपूर्ण माहिती असलेली फ़ाईल वाचण्यासाठी तिने उंदराचे कान दोन-तीनदा दाबले. तिने फ़ाईलच्या सर्व कागदांवरून हळूहळू नजर फिरविली. तिला खुदकन हंसू आले. तिने फाईल लगेच बंद केली व आपल्या वॉर्डरोबकडे वळली.
सकाळी ५॥ वाजताच जॉगिंग-स्विमिंगसाठी घराबाहेर पडलेला नृसिंह दररोजप्रमाणे सातच्या सुमारास घरी आला व रोजच्या सवयीने आपल्या किल्लीने त्याने घरचा दरवाजा उघडला. दोन-चार पाऊले घेताच तो थबकला. ’आपण आपल्याच घरात शिरलो आहोत ना?’, असे वाटून तो क्षणभर गोंधळला. ट्रेमध्ये चहाचा ’मग’ घेऊन वासंतीच त्याच्याकडे येत होती.
नृसिंहाच्या चेहेर्यावरचे भाव पाहून वासंतीला हंसू आले. राहणीमानाची संस्कृती कितीही बदलली तरी आश्चर्याचा धक्का बसल्यावर माणूसतोंडाचा आऽऽ करून, मोठ्या डोळ्यांनीच का पाहत?, असा विचार तिच्या मनात आला होता.
’असा काय पाहतो आहेस आऽऽ वासून?’, वासंतीने विचारले. ’अगं! इतक्या सकाळी तुला कपड्यांमध्ये आणि तेही साडी, कुंकू-बागड्यांमध्ये पाहिल्यावर मला आश्चर्य वाटायला नको का?’, नृसिंहाने आश्चर्य वाटण्याचे कारण सांगून टाकले. ’लाडक्या लिओ, तूं चहा तर घे मग सांगते तुला.’, वासंती चहाचा कप त्याच्या हातात देत म्हणाली.
वरील परिच्छेद म्हणजे माझ्या लघुकथेचा परिचय आहे. कथेमध्ये रस निर्माण झाला असेल, म्हणजे १५ मिनिटांची कथा वाचायला वेळ असेल तर तुम्हाला दोन पर्याय आहेत.
१. व्हिडिओ फ़ॉर्मॅटमधे वाचण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा. क्लिक करा.

२. पी डी एफ़ फ़ॉर्मॅटमध्ये वाचण्यासाठी (कॉपी पेस्ट करून) http://www.keepandshare.com/doc/3034107/warhadee-ethnic-holiday-marathi-laghukatha-70k?da=y/
या लिंकवर जा.

Advertisements

About Suhas Phanse

Suhaasa PhaNase is a poet whose Marathi Songs are showcased in Youtube to enable viewers not only to read his lyrics but also to sing the song to the tune he suggests with his voiceover. Audience of musical concerts are known to lip sing with the singer. Some even whisper sing and have to be politely silenced. Audience does not only listen but identifies with the musical rendering. Pleasure that audience gets by imagining that they themselves are singing is immense notwithstanding its vicarious nature. Purpose of streaming such videos is to provide new Marathi songs to sing for Marathi netizens. The visitor has many choices viz. Premgeete, Virahgeete, Bhajan, Bhaktigeete, Bhavgeete, Balgeete, Kishorgeete, Kumargeete, Shrungargeete, Badbadgeete, Deshbhaktigeete, Vivahgeete, Managalashtak, nisargageete, GondhaL, Jogava. Do forward this URL to your friends.
This entry was posted in Entertainment, Marathi Katha and tagged , , , , , , , , , , , . Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s